स्वत:ला डॉलरच्या कक्षेतून दूर करण्यासाठी चीन आपल्या डिजिटल युआनसह पुढे येत आहे
चीन च्या सरकारला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना चांगलच माहित आहे की कोविड-१९ नंतरच्या जगात त्यांना आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागणार आहे. वुहानमध्ये पहिल्यांदा हा रोग दिसला तेव्हा चीनने पुरेशी कारवाई केली नाही या आधारावर भरपाईसाठी अमेरिकेच्या कित्येक कायदेशीर कारवाईचा प्रारंभ करण्यासाठी त्यांना सुरुवात करावी लागेल.
या संकटाने हे देखील स्पष्ट केले आहे की जीवनावश्यक पुरवठ्यासाठी एका देशावर जास्त अवलंबून असल्यास त्याचे काही तोटे देखील आहे आणि त्यामुळेच चीनमधील पुरवठा साखळ्यांची पुनर्रचना देखील केली जाऊ शकते. हे चीनला कळून चुकले आहे.
चीनने आता स्वत:च्या स्वावलंबनाच्या योजनांना गती देण्याची प्रक्रिया वेगाने सुरु केली आहे आणि यापैकी एक मुख्य हेतू म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या मध्यवर्ती बँकेतर्फे डिजिटल चलन तयार करणे. विशेष म्हणजे ह्या डिजीटल चलानाच्या चाचण्या आता शेन्झेन(Shenzhen), चेंगदू(Chengdu), सुझहू(Suzhou) आणि झिओनगॅन (Xiong’an)मध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत.
डिजिटल करन्सी / इलेक्ट्रॉनिक पेमेंट हे प्रकल्प तसे सर्वांनाच ज्ञात आहेत म्हणून हा प्रकल्प दिग्गज कंपन्या अलिबाबा आणि टेंन्सेंट यांनी उभारलेल्या पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चरला पर्याय ठरवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत आणि ह्या वर्षाच्या अखेरीस हा प्रकल्प सुरु देखील होईल. ह्या प्रकल्पाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामधे देयके(Payments) हे ऑफलाइन देखील करता येतील आणि ग्रामीण भागात अधिक सहजपणे वापरली जाऊ शकतील आणि चीनचा पहिला कॅशलेस सोसायटी बनण्याच्या उद्दीष्टातील मुख्य अडथळा दूर होईल.
पण यामधे एक आंतरराष्ट्रीय आयाम देखील आहे. फेसबुकने स्वत: च्या डिजिटल चलनासाठी, लिब्रा प्रोजेक्टच्या माध्यमातून चीन ला प्रोत्साहित केले असावे त्यामुळेच चीनला वाटते की देशाविरूद्ध कोणत्याही अमेरिकन निर्बंधात हे एक अस्त्र बनू शकते.
चीनचे डिजिटल चलन रेनमिनबीचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यात आणि चिनी कंपन्यांना व्यापारासाठी चलन म्हणून अमेरिकन डॉलरवर कमी निर्भर राहण्यास हा प्रकल्प नक्कीच मदत करेल. कोविडनंतरच्या जगात ह्या प्रकल्पाचे महत्व पूर्वीपेक्षा अधिक असेल.
Comments
Post a Comment